मुंबईः पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या भाजप नेत्या यांचा फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी मोठा गदारोळ माजला होता. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चित्रा वाघ यांचे मोर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. भाजप नेत्यांनीही या फोटोंवर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज चित्रा वाघ यांनी सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. तसंच, फोटो मॉर्फिंग प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

वाचाः
फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. आता या प्रकारात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य सरकारला लक्ष्य करणाऱ्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवल्यानंतर त्या आक्रमक झाल्या आहेत. माझ्या नवऱ्याने एक रुपयाही घेतलेला नाही. तो त्या ठिकाणी नव्हताच. राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपल्या पतीचा छळ करीत आहे. मी मुंबई बँकेतून कधीही कर्ज घेतलेले नाही आणि असे असतानाही एसीबी बँकेला ३० लाखांच्या कर्जाची माहिती देण्यास सांगत आहे. याविरुद्ध आपण न्यायालयीन लढाई लढू, असंही त्या म्हणाल्या आहेत.

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here