नाशिक: नाशिकमधील उच्चभ्रू वस्तीत एका बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर रस्त्यावर बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांचे पथक आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथकही घटनास्थळी पोहोचले. ही वस्तू कचरा गोळा करणाऱ्यांना दिसल्याचे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील केला होता.

नाशिकच्या कॉलेज लिंक रोडवर ही संशयास्पद वस्तू आढळून आली. शहरातील अत्यंत संवेदनशील परिसर असून, या ठिकाणी अनेक व्यापारी संकुले आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे बंगले आहेत. या वस्तीतील रस्त्यावरच ही बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. कचरा गोळा करणाऱ्या ही वस्तू दिसली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा मोठा ताफा आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथक त्याठिकाणी पोहोचले. खबरदारी म्हणून सर्वात आधी परिसर सील केला. ही कोणतीही मॉकड्रील नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शहरातील प्रख्यात बिल्डर जीतूभाई ठक्कर यांच्या घरासमोरील रस्त्यावर बॉम्बसदृश्य वस्तू सापडली. टेनिस बॉल होता. त्यात फटाक्यांसाठी वापरण्यात येणारी गनपावडर होती. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केल्यावर हे स्पष्ट झाले. पावडर आणि अॅल्युमिनियम पावडरला फायबरचे आवरण होते. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या साहेबराव नवले यांनी ते निकामी केले. मात्र, पोलिसांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here