मुंबई: वर्ध्याच्या हिंगणघाटपाठोपाठ औरंगाबादच्या येथे एका महिलेला रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले असून या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रातून पडसाद उमटत आहेत. औरंगाबादमधील जळीत कांड हे पीडित महिला आणि आरोपीच्या वैयक्तिक संबंधातून झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिली.

पीडित महिला आणि आरोपीचे वैयक्तिक संबंध होते आणि त्यांच्यातील वादातून ही दुर्देवी घटना घडल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील येथे सोमवारी संतोष मोहिते या ५० वर्षीय व्यक्तिने पीडित महिलेवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. ही महिला एकटीच राहते. ती सोमवारी घरी एकटीच असताना मोहिते तिच्या घरी आला. ‘तू रात्री-अपरात्री का येतो, तुझ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे’ असे ती त्याला म्हणाली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले व संतप्त आरोपी संतोषने तिला शिवीगाळ व मारहाण करीत घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले आणि आरोपी पळून गेला. वर्ध्यानंतर ही घटना उघकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here