मुंबईः पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक भागांत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनीही केंद्र सरकारला एक सल्ला दिला आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालय पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. पेट्रोल – डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे. मात्र, एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्यानं विचार करेल, ही अपेक्षा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

वाचाः

दरम्यान, आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत. त्यामुळं ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज मंगळवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१९ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here