पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जे. जे रुग्णालयात करोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनीही आज जे. जे रुग्णालयात करोनावरील लस घेतली आहे.
उदय सामंत यांनी ट्वीट करत करोनावरील लस घेण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. कोमोरबीड (सहव्याधी) असल्यानं मला ५४ ते ५९ वयोगटात ही लस देण्यात आली, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनीही घेतली लस
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी करोना प्रतिबंधक लस घेतली. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पवार यांनी ही लस घेतली आहे. करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पवार यांच्यापाठोपाठ त्यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, पत्नी प्रतिभा पवार यांनीसुद्धा करोनाची लस घेतली आहे. पवार यांनी पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली. त्यानंतर त्यांना ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times