मिळालेल्या माहितीनुसार, , धमकावणे आणि लग्नाच्या भूलथापा देऊन फसवणूक करणे असे आरोप पीडित महिलेने सुनीतवर केले आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, लोणावळा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
महिलेने सुनीतविरोधात सुरुवातीला भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, गुन्हा लोणावळ्यात घडला असल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सुनीतला अटक केली. पीडितेच्या तक्रारीनुसार, ती नोकरीच्या शोधात होती. त्याचवेळी तिची ओळख सुनीतशी झाली. त्याने तिला नोकरीचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने तिच्याकडे मोबाइल क्रमांक मागितला. एकाच परिसरात राहत असल्याने तिने क्रमांकही दिला. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. काही दिवसांनी त्याने प्रेम असल्याचे सांगितले. बायकोशी पटत नसून घटस्फोट देणार असल्याची बतावणी त्याने केली. सुनीतने लोणावळ्यातील एका हॉटेलवर नेले. तिथे अत्याचार केले. मात्र, पत्नी घटस्फोट देत नसल्याचे त्याने सांगितले. त्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भोईवाडा पोलिसांनी हे प्रकरण लोणावळा पोलिसांकडे वर्ग केले. पोलिसांनी तपास करून सुनीतला अटक केली.
सुनीतला अटक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनीत याच्याशी काँग्रेसशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times