नागपूरः मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ल्याचा संबंध नाही, असा हल्ला अशक्य आहे, असा दावा माजी उर्जामंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस यांनी केला होता. मात्र, गृहमंत्र्यांनी बावनकुळेंचा हा दावा खोडून काढला असून हा विषय बावनकुळेंना समजू शकणार नाही, असा पलटवार केला आहे.

मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या पॉवर कट मागे घातपात असल्याची माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेत सरकारवर हल्ला चढवला आहे. आज पत्रकार घेत मंत्री धादांत खोटे बोलत असून सर्व कपोकल्पित आहे. वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार पूर्णतः मानवनिर्मित आहे. याबाबत केंद्राला पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बावनकुळेंच्या या आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री व उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हसं करुन घेऊ नये, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आरोपानंतर नितीन राऊत यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून मुंबईतील पॉवर कटचे संपूर्ण अहवाल उद्या अधिवेशनात सादर करणार असल्याचं, राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत १२ ऑक्टोबरला विजेचा घोळ होऊन एकाचवेळी संपूर्ण मुंबईची वीज ग्रीड कोसळली होती. यामागे चिनी घातपात असल्याचे समोर आले आहे. चीनचा संबंध असलेल्या काळ्या यादीतील कंपन्यांकडून कमीत कमी १४ वेळा एमएसईबीच्या (महापारेषण-राज्य भार प्रेषण केंद्र) सर्व्हरवर व्हायरस हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, सायबर सेलने या अहवालात म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here