मुंबईः आज राज्यात ७ हजार ८६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, ६ हजार ३३२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने चिंता वाढत चालली होती. मात्र, आज करोना रुग्ण आणि करोना मुक्त रुग्णांच्या संख्येत एक हजारांचा फरक दिसून येत आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं समोर येतं आहे. आज राज्यात ७ हजार ८६३ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या २१ लाख ६९ हजार ३३० इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १ कोटी ६४ लाख २१ हजार ८७९ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

आज ६ हजार ३३२ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. त्यामुळं आजपर्यंत एकूण २० लाख ३६ हजार ७९० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३. ८९ टक्के इतका आहे.

राज्यात आज ५४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं अजूनही करोनामृतांचा वाढता आकडा अटोक्यात येत नसल्यानं चिंता कायम आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांचा आकडा ५२ हजार २३८ इतका झाला आहे. तर, सध्या राज्यात ७९ हजार ०९३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here