मुंबई : गेल्या तीन महिन्यात मुंबईतील स्थावर मालमत्ता क्षेत्राने उभारी घेतली आहे. नुकताच संपलेल्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईत १०००० हून अधिक घरांची नोंदणी झाली आहे. तब्बल ११००० कोटींचे व्यवहार झाले असून मुद्रांक शुल्क कपातीचा ( benefit real estate ) फायदा झाल्याचे महाराष्ट्र () या संस्थेने म्हटलं आहे.

प्रॉप्सस्टॅक या संस्थेच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबईतील स्थावर मालमत्ता बाजारपेठेत ११७४५ कोटीचे व्यवहार झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा त्यात ३४ टक्के वाढ झाली आहे. तर जानेवारी २०२१ च्या तुलनेत या उलाढालीत १५ टक्के वाढ झाली. डिसेंबरमध्ये देखील मुंबईत तब्बल ३४००० कोटींची उलाढाल झाली होती. या महिन्यात आलिशान फ्लॅट्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने २६ ऑगस्ट २०२० मध्ये स्थावर मालमत्तांवरील मुद्रांक शुल्कात तात्पुरती कपात केली होती. सरकारने मुद्रांक शुल्क ५ टक्क्यांवरून २ टक्के केले होते. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्क २ टक्के होते. तर १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क ३ टक्के आहे.

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी १०१७० प्रॉपर्टीची नोंदणी झाली. गेल्या महिन्यात जानेवारी २०२१ मध्ये १०४१२ घरांची नोंदणी झाली. मागील तीन महिने घर खरेदी वाढली आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कपात केल्याने ग्राहकांनी घर खरेदीला प्राधान्य दिले आहे. सध्या बँकांचे गृहकर्जाचे दर देखील कमी आहेत. त्यातच मुद्रांक शुल्क कपातीने ग्राहकांची बचत होणार असल्याने मुंबईत प्रॉपर्टीचे व्यवहार वाढले असल्याचे नरडको महाराष्ट्रचे अध्यक्ष अशोक मोहनानी यांनी सांगितले.

मार्चअखेर ३ टक्के मुद्रांक शुल्क असल्याने घरांची विक्री आणखी वाढेल, असा विश्वास मोहनानी यांनी व्यक्त केला. सध्याची स्थिती पाहता मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात घरांची नोंदणी होईल, असा अंदाज दि गार्डियन रिअल इस्टेट अॅडव्हायझरीचे कार्यकारी संचालक राम नाईक यांनी व्यक्त केला. परवडणाऱ्या घरांच्या व्यवहारामध्ये वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here