नवी दिल्लीः मुंबईतील ‘पावर कट’वरून ( ) महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारमध्ये आता ‘पावर प्ले’ रंगला आहे. चीनच्या सायबर हल्ल्यामुळे ( ) मुंबईतील ‘पावर कट’ झाल्या अंदाज महाराष्ट्र सरकारने व्यक्त केला आहे. तर यासंबंधी चीनच्या सायबर हल्ल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. एवढचं नव्हे तर केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह ( ) यांनी मुंबईतील ‘पावर कट’ची घटना ही ‘मानवी चूक’ असल्याचं सिंह म्हणाले.

चीनच्या सायबर हल्ल्याचा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून ते देशातही होऊ शकतो, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता. न्यूयॉर्क टाइम्स यासंदर्भात वृत्तही दिलं होतं. मुंबईचा विजपुरवठा खंडीत करण्यामागे चीन हॅकर्स असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं. यानंतर सोमवारी यासंबंधी गृहमंत्रालयाने ऊर्जा विभागाला यासंबंधी केलेल्या तपासाचा अहवाल दिला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही चिनी हॅकर्सने सायबर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला. पण आता केंद्र सरकारने अशा कुठल्याही सायबर हल्ल्याचे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या प्रकरणी तीन तर्क मांडले आहेत.

तपासात असे काही आढळले नाही

मुंबईतील ‘पावर कट’ संबंधी तपास करण्यात आला. ही एक मानवी चूक आहे. हा सायबर हल्ला नाही. पहिल्या पथकाने तपासानंतर दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. तर सायबर हल्ला झाला होता, पण त्याचा मुंबईतील विजपुरवठ्याशी काहीही संबंध नाही, असं दुसऱ्या पथकाने तपासातनंतर दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे.

वितरण केंद्रांवर हल्ले पण यंत्रणेवर नाही

देशातल्या उत्तर आणि दक्षिण भागातील वितरण केंद्रांवर हल्ले झाले होते. पण मॉलवेअर आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये पोहोचू शकले नाही, असं सिंह म्हणाले. मुंबईतील SCADA यंत्रणेवर हल्ला झाल्याची माहिती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आपल्याला दिली, असं सिंह म्हणाले.

सायबर हल्ल्यामागे चीन किंवा पाक, याचे पुरावे नाही

हा सायबर हल्ला चीन किंवा पाकिस्तानने केल्याचे आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. या सायबर हल्ल्यामागे जो हॅकर्स ग्रुप आहे तो चीनचा आहे, असं काही जण सांगत आहेत. पण आपल्याकडे यासंबंधी कोणतेही पुरावे नाहीत. यामुळे चीन त्याचा इन्कारच करेल.

महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांचा दावा

गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईचा विजपुरवठा खंडीत झाला होता. मुंबईचा जवळपास १० ते १२ तास वीजपुरवठा ठप्प होता. चिनी हॅकर्सनी सायबर हल्ला करून हा विजपुरवठा खंडीत केला होता, असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं. गलवानमधील भार-चीन सैनिकांमधील रक्तरंजित संघर्षानंतर हा हल्ला केला गेला, असं वृत्तात म्हटलं आहे. चिनी हॅकर्स ग्रुप APT10 ह सायबर हल्ला केल्यांच म्हटलं गेलं. या प्रकरणी महाराष्ट्राच्या सायबर विभागाने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिला. दोन्ही मंत्र्यांनी चिनी हॅकर्सनी सायबर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे उद्या या प्रकरणाचा तपास अहवाल विधिमंडळात सादर करणार आहेत.

चीनने आरोप फेटाळून लावला

चीन कुठल्याही प्रकारच्या सायबर हल्ल्यांचा निषेध करतो. अशा प्रकरणांमध्ये संशय घेण्यास काहीही अर्थ नाही. कुठल्याही पुराव्यांशिवाय आरोप करणं हा हलगर्जीपणा असल्याचं चीनने म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भात निवेदन देण्यात आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here