वाचा:
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण विरोधकांनी लावून धरलं आहे. भाजपने यावरून आक्रमक होत राज्यभरात निदर्शने केली. भाजपच्या महिला आघाडीने याविरोधात मोठे आंदोलन उभे केले. या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करत भाजपने कारवाईची मागणी केली. त्यात प्रदेशाध्यक्ष यांनी तर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास सभागृहात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा इशारा दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राठोड यांना पदावरून दूर व्हावं लागलं. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी रविवारी राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नसताना हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचलं आहे.
वाचा:
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी फौजदारी रिट याचिका समाजिक कार्यकर्ता यांनी केली असून पुणे पोलिसांच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ही याचिका येत्या काही दिवसांत सुनावणीला येण्याची शक्यता आहे.
याचिकेत नेमकं काय म्हटलंय?
पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास होणे आवश्यक आहे. या मृत्यूमागे माजी वनमंत्री संजय राठोड आणि अरुण राठोड नावाची व्यक्ती गुंतली असल्याचे दिसत आहे. मात्र, राजकीय दबावामुळे पुण्यातील वानवडी पोलीस निष्पक्ष तपास करताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांना या दोघांविरोधात एफआयआर नोंदवून तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत या दोघांसह राज्याचे पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त आणि वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times