अजय काही कामानिमित्त गोरेगाव, दिंडोशी इथं आला असताना एका व्यक्तीनं त्याची कार रोखली. अजयची कार रोखणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. गाडी रोखणारी व्यक्ती पंजाबी भाषेत अजयला आंदोलनाला आणि पंजाबला विरोध केल्याप्रकरणी जाब विचारताना दिसत आहे. तू आंदोलनावर गप्प का आहेस? आंदोलनला विरोध का केला असंही हा व्यक्ती म्हणताना दिसतोय. तब्बल १५ मिनिटे या व्यक्तीनं अजयची कार अडवली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
काही दिवसांपूर्वी अमेरिका, ब्रिटन, कॅनडातील सेलिब्रेटींनीही या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हॉलिवूड पॉप स्टार
हिनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली होती. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यामुळं रिहानावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी निशाणा साधला होता.
यानंही रिहानावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.’भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. ही वेळ आपण एकत्र उभं राहण्याची आहे’, असं म्हणत अजयनं रिहानाला सुनावलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times