औरंगाबाद: शहर आणि जिल्ह्यात रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून स्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. त्यात हद्दीत तर अत्यंत कठोर पावले उचलण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. ( )

वाचा:

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी ३२५ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ५० हजार ९१६ पर्यंत पोहोचली आहे. तसेच मंगळवारी जिल्ह्यातील १२८ बाधित करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ४७ हजार २५६ झाली आहे व सध्या जिल्ह्यात २ हजार ३८९ सक्रिय बाधित आहेत. औरंगाबाद शहरात रुग्णसंख्यावाढ मोठी असून ही बाब ध्यानात घेऊन महापालिकेचे प्रशासक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहराच्या ज्या भागात जास्त गर्दी, जास्त बाधित आढळतील त्या भागात करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराच पांडेय यांनी दिला आहे.

वाचा:

दरम्यान, महापालिकेतर्फे शहरातील पाच प्रमुख सरकारी कार्यालयांत करोना चाचणी केली जात आहे. अँटिजेन पद्धतीने करण्यात येत असलेल्या या चाचणीत मंगळवारी सात व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

मुंबईतून परतलेल्या एसटी कामगाराचा मृत्यू

मुंबईत बेस्ट बसमध्ये प्रवासी वाहतूक करण्याचे कर्तव्य बजाविल्यानंतर औरंगाबादला परतलेले एसटी कामगार रंजित चव्हाण (४५, रा. एन ५, सिडको) यांचा करोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रंजित चव्हाण यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तिथे त्यांचा मृत्यू झाला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here