मुंबई: बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला पाच वर्षानंतर अखेर मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला असून याप्रकरणातील आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी तुरुंगात आहे.

२०१२ रोजी उजेडात आलं होतं. याप्रकरणी पीटर मुखर्जीला २०१५मध्ये अटक करण्यात आली होती. आज पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. मात्र हा आदेश सहा आठवड्यांसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्याने मुखर्जीला अजून सहा आठवडे तुरुंगात रहावे लागणार आहे. पीटरच्या जामिनाला आक्षेप घेण्यासाठी सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याकरिता वेळ मिळावा म्हणून कोर्टाने हा आदेश प्रलंबित ठेवला आहे.

इंद्राणी मुखर्जी ही शीना बोराची आई होती. मात्र ती शीनाची ओळख लहान बहीण म्हणून करून द्यायची. इंद्राणीलाही २०१५मध्ये शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आले होते. तिची कसून चौकशी केल्यानंतर पीटरलाही पोलिसांनी अटक केली होती. मात्र पीटरने तपास यंत्रणाविरोधात एकही पुरावा नसल्याचा दवाा करत तुरुंगातून सुटका करण्याची वारंवार मागणी केली होती. शीनाची हत्या झाली तेव्हा आपण लंडनमध्ये होतो, असं पीटरने म्हटलं होतं.

सीबीआयने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पीटर हा शीना बोरा हत्याकांडातील सायलंट किलर असल्याचं म्हटलं होतं. पीटरचा या हत्येत समावेश असल्याचा सबळ पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा सीबीआयचे वकील भरत बदामी यांनी म्हटलं होतं. पीटरने शीनाचा शोध घेण्यासाठी काहीही पावले उचलले नव्हते, असंही सीबीआयने म्हटलं आहे. आपल्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी पीटरने शीनाबाबतची भलतीच कहानी रचल्याचंही सीबीआयने म्हटलं आहे. शीनाचे पीटरचा मुलगा राहुल मुखर्जी सोबत संबंध असल्याचं उघड झालं होतं. शीना ही पीटरची पत्नी इंद्राणीच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी होती. ती इंद्राणी सोबत राहत होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here