मुंबई: लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील नागरिक आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून मुंबईसाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. मुंबईतील आणखी २९ खासगी रुग्णालयांत लस दिली जाणार असून त्यामुळे लसीकरणाला होणारी गर्दी टाळणे शक्य होणार आहे. ( )

वाचा:

करोना लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका केंद्रांव्यतिरिक्त आता भारत सरकारने जाहीर केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या २९ अतिरिक्त खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे, असे नमूद करत मुंबई पालिकेने या रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे.

‘या’ खासगी रुग्णालयांतही :

१. सुश्रुषा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विक्रोळी
२. के. जे. सोमय्या हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
३. डॉ. बाळाभाई नानावटी हॉस्पिटल
४. वोकहार्ट हॉस्पिटल
५. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल
६. सैफी हॉस्पिटल
७. पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसी
८. डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल
९. कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट
१०. मसिना हॉस्पिटल
११. एस. एल. रहेजा हॉस्पिटल
१२. अँड मेडिकल रिसर्च सेंटर
१३. गुरुनानक हॉस्पिटल
१४. मुंबई हॉस्पिटल
१५.
१६. फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड
१७. भाटिया जनरल हॉस्पिटल
१८. ग्लोबल हॉस्पिटल
१९. सर्वोदय हॉस्पिटल
२०. जसलोक हॉस्पिटल
२१. करुणा हॉस्पिटल
२२. एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल
२३. एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल
२४. कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल
२५. कॉन्वेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन हॉस्पिटल
२६. सुराणा सेठिया हॉस्पिटल
२७. होली स्पिरिट हॉस्पिटल
२८. टाटा हॉस्पिटल
२९. होली फॅमिली हॉस्पिटल

वाचा:

दरम्यान, केंद्र सरकारच्या आदेशान्वये लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून राबविण्यात येत आहे. या टप्पात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर टप्पा शासकीय तसेच खासगी रुग्णालयात राबविण्यात येत आहे. जी खासगी रुग्णालय जन आरोग्य योजना तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा रुग्णालयांना आधी लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले होते. त्यात आता बदल करण्यात आल्याने एकूण २९ खासगी रुग्णालयांत आता लसीकरण करता येणार आहे. महानगरपालिका व शासकिय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयात प्रत्येक मात्रांसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यात १५० रुपये लसीचे व १०० रुपये सेवा शुल्क असणार आहे.

वाचा:

मुंबई महानगरपालिकेची कोविड लसीकरण केंद्रे

१. बीकेसी जंबो कोविड केंद्र, बांद्रा
२. मुलूंड जंबो कोविड केंद्र, मुलूंड
३. नेस्को जंबो कोविड केंद्र, गोरेगाव
४. सेव्हन हिल रुग्णालय, अंधेरी
५. दहिसर जंबो केंद्र, दहिसर

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here