तेजपूरः काँग्रेसच्या सरचिटणीस वाड्रा ( ) यांनी मंगळवारी आसाममध्ये प्रचारसभा ( ) घेतल्या. यादरम्यान प्रियांका गांधी या आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये चहाची पानं तोडतानाही दिसल्या. आसामच्या चहावरून ( ) प्रियांका गांधींनी विरोधकांवर निशाणाही साधला.

बडे राजकीय नेते हे चीन आणि जपानचा ग्रीन टी पिताना दिसतात. त्यांना तुम्ही जरा आसामचा कडक चहा द्या, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. प्रियांका गांधी यांनी आसामच्या तेजपूरमध्ये प्रचारसभा घेतली. अनेक बडे नेते इथे विमानाने येतात. पण चीन आणि जपानमधील ग्रीन टी ते पितात. त्यांना आता आसामचा ‘कडक चहा’ पाजण्याची गरज आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

आसाममधील विधानसभा निवडणुकीत चहाच्या बागा आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. यावरून प्रियांका गांधी यांनी मजूर आणि महिलांना मोठं आश्वासन दिलं आहे. आसाममध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास चहाच्या मळ्यांमध्ये मंजुरी करणाऱ्या महिलांची रोजंदारी ३६५ रुपयांपर्यंत वाढवू. तसंच महिलांना २ हजार रुपये महिन्याला देऊ. याशिवाय ५ लाख नोकऱ्या उपलब्ध करून देऊ. ही फक्त आश्वासनं नाही तर हमी आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होऊ देणार नाही. प्रत्येक कुटुंबाला २०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. यामुळे नागरिकांची दर महिन्याला वीज बिलात १४०० रुपये बचत होईल, असं प्रियांका गांधींनी सांगितलं.

आसाममध्ये १२६ जागांसाठी ३ टप्प्यात मतदान

आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागणार आहे. आसाममध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. सर्वानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने ८९ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ६० जागांवर भाजपचा विजय झाला. तर असम गण परिषदने ३० जागांवर निवडणूक लढवली होती. पण त्यांना १४ जागा जिंकता आल्या. बोडोलँड पिपल्स फ्रंटने १३ जागांवर निवडणूक लढवत १२ जागा जिंकल्या. तर काँग्रेसने १२२ जागा लढवल्या. पण त्यांना फक्त २६ जागांवर विजय मिळवता आला.

प्रियांका गांधींनी चहाच्या मळ्यात मजुरी करणाऱ्या महिलांचे मन जिकले...

आसाममधील दोन दिवसांच्या प्रचार दौऱ्याची सुरवात प्रियांका गांधी प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात पूजा करून केली. अनेक दिवसांपासून इथे येण्याची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली, असं पूजा केल्यानंतर प्रियांका गांधी म्हणाल्या. यानंतर त्यांनी लखीमपूरमध्ये चहा मळ्यांमध्ये मजुरी करणाऱ्या महिलांसोबत झुमुर नाच केला.

बिश्वनाथ जिल्ह्यातील सधुरा नावाच्या चहाच्या मळ्यात प्रियांका गांधी गेल्या. या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांसोबत त्यांनी चाहाची पानंही खुडली आणि त्यांच्याशी बोलून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. प्रियांका गांधी आपला हा अनुभव अतिशय सुंदर होता, असं प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून सांगतिलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here