बेंगळुरू, नवी दिल्लीः कर्नाटकचे मंत्री ( ) बी.सी. पाटील ( ) यांनी मंगळवारी करोनावरील लस घेतली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर आता करोनावरील लस ( ) घेणाऱ्यांमध्ये पाटील यांचाही समावेश झाला आहे. मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी त्यांनी लस घेतली. पण पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतली. पंतप्रधान मोदी यांनी एम्समध्ये जाऊन लस घेतली, अमित शहांनी मेदांता हॉस्पिटलमध्ये आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये लस घेतली होती.

करोनावरील लस असुरक्षित आहे, ही नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी घरीच लस घेतली, असं मंत्री पाटील म्हणाले. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेतली असती तर आपल्यामुळे इतर नागरिकांना ताटकळत रहावं लागलं असतं. पण इथे मी नागरिकांनाही भेटू शकतो आणि लसही घेऊ शकतो. यात चुकीचं काय आहे? असं पाटील म्हणाले. एएनआयने हे वृत्त दिलं आहे. बी. एस पाटील यांनी हावेरी जिल्ह्यातील हिरेकेरुर या आपल्या गावातील घरी लस घेतली.

करोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता पाटील यांच्या या कृतीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रोटोकॉलनुसार अशी कुठलीही परवानगी नाहीए. राज्य सरकारला यासंबंधी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं राजेश भूषण म्हणाल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र डोड्डामणी यांनी तालुक्याचे आरोग्य अधिकारी झेड. आर. मकंदर यांना नोटीस बजावली आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला सवाल

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. सरकार करोनावरील लसचा एक डोस २१० रुपयांना विकत घेतंय. पण जनतेला मात्र २५० रुपयांना विकत घ्यावा लागतोय. अर्थमंत्र्यांनी करोनावरील लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. या तरतुदीचं काय झालं? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here