म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
कांजुरमार्ग येथे मेट्रो-३ प्रकल्पाची कारशेड उभारण्यासाठी राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती नगरविकासमंत्री यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. कारशेडसाठी ही जागा योग्य असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

प्रश्नोत्तराच्या तासात एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मेट्रो कारशेडसाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. सन २०३१पर्यंत आरे कारशेडमध्ये ४२ गाड्यांचा समावेश करता येईल. पुढील वाहतुकीसाठी पाच हेक्टर जागेची आवश्यकता लागेल. त्यासाठी एक हजारापेक्षा अधिक जुनी झाडे तोडावी लागतील, असे शिंदे यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here