म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीत अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना विधानसभेच्या हक्कभंग समितीने समन्स बजावले आहे. या समन्सनुसार बुधवारी सायंकाळी ५ वाजता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात त्यांना हजर राहावे लागणार आहे.

शिवसेना आमदार यांनी हा हक्कभंग मागील अधिवेशनात दाखल केला होता. अर्णव यांना यापूर्वीही हक्कभंगाबाबत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र ते आजवर हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहिलेले नाहीत. आता बुधवारी ते विधिमंडळात येऊन समितीला सामोरे जातात किंवा नाही, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here