म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

वीजबिलाच्या प्रश्नासह इतर प्रश्नांवर मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष मंगळवारी विधान भवनात येणार होते. पण विधान भवनात आल्यावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक होते. मात्र राज यांनी ही चाचणी केली नसल्यामुळे त्यांना त्यांचा विधान भवनातील भेटीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचे कळते

वीजबिल प्रश्नासह अन्य मुद्द्यांवर मनसेने आक्रमक आंदोलने केली आहेत. त्यामुळे या प्रश्नाबरोबरच राज्यासंबंधी इतर काही प्रश्नांवर राज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार होते. मात्र मास्क न घालणारे राज ठाकरे विधान भवनात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणार का, यावरून जोरदार चर्चा होती. त्यात आरटीपीसीआर चाचणी केली नसल्यामुळे राज विधान भवनात येणार नसल्याची बातमी पसरल्यानंतर त्याविषयीच सर्वत्र चर्चा होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here