मुंबईः शिवसेनेचे नेते यांचं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राठोडांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सोपावला होता. मात्र, राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं राठोड यांच्या राजीनाम्याचे पुढे काय झालं?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप करत भाजपनं कारवाईची मागणी केली होती. भाजपनं संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता तसंच, अधिवेशन चालू न देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी राठोडांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

वाचाः

रविवारी संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत राजीनामा सोपवला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतलेली नाही, असं म्हटलं होतं. मात्र, राजीनामा घेऊन तीन दिवस उलटले तरीही संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नाही. त्यामुळं कायदेशिररित्या अजूनही राठोड मंत्रिपदी कायम आहेत, अशी चर्चा सुरु आहे. टाइम्स ऑफ इंडियानं या प्रकरणी वृत्त दिलं आहे.

वाचाः

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा मार्च अखेरीस स्वतःकडेच ठेवू शकतात. सध्या पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास सुरु आहे. अहवाल आल्यानंतर राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात येऊ शकतं किंवा त्यांच्याकडे दुसरं खातं दिलं जाऊ शकतं, असं शिवसेना नेत्यानं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं शिवसेनेच्या नेत्याच्या हवाला देत यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

वाचाः

दरम्यान, राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळं मुख्यमंत्री अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचीही चर्चा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here