कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये लज्जास्पद घटना घडली आहे. एका माथेफिरू तरुणाने चार वर्षांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या आईवर केला. पीडितेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. खोलीतून मुलाला घेऊन ती बाहेर पडली आणि बाहेरून दरवाजाची कडी लावून घेतली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत आपल्या चार वर्षांच्या मुलासह राहते. महिलेचा पती लखनऊमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करतो. पीडितेच्या तक्रारीनुसार, गेल्या सोमवारी मध्यरात्री शेजारी राहणारा तरुण जबरदस्ती घरात घुसला. त्याने मुलाला उचलून घेतले आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि खोलीबाहेर मुलाला घेऊन गेली. बाहेरून दरवाजाची कडी लावून आरोपीला खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर आरडाओरडा करत मदत मागितली. आजूबाजूचे लोक धावून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीला अटक केली. नवाबगंज पोलीस ठाण्याचे अधिकारी देवेंद्र दुबे यांनी सांगितले की, आरोपीच्या विरोधात बलात्कार, एससीएसटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असून, तिचा जबाबही नोंदवून घेतला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here