पालघर: अनेक सीसीटीव्ही फुटेज आणि हजारो मोबाइल कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर पोलिसांनी वसई येथील महिला पोलीस कॉन्स्टेबलचा पती पुंडलिक पाटील याच्या हत्येचा छडा लावला. पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच पुंडलिक पाटीलच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. त्यासाठी महिला कॉन्स्टेबलच्या प्रियकराने त्याच्या दोन जवळच्या मित्रांना अडीच लाख रुपयेही दिल्याची माहिती उघड झाली आहे.

विकास पष्टे (वय २८) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर स्वप्नील गोवारी (वय २५) आणि अविनाश भोईर (२१) असे अन्य दोघांची नावे आहेत. पष्टे हा देखील पोलीस कॉन्स्टेबल असून, तो वसईगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तर गोवारी हा एजंट असून, भोईर हा इलेक्ट्रिशियन आहे.

पष्टेची चौकशी केली असता, धक्कादायक माहिती उजेडात आली. पष्टेनेच रिक्षाचालक पाटीलच्या हत्येची सुपारी दिली होती. गोवारी आणि भोईर या दोघांनी पाटीलची रिक्षा मागवली. सिरसाटला जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी अचानक रिक्षा मनोरच्या दिशेने घ्यायला सांगितली. काही काम आहे अशी बतावणी केली. रस्त्यात त्यांनी पाटीलवर पाठिमागून चाकूने वार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पष्टे आणि पाटीलची पत्नी या दोघांचे प्रेमसंबंध आहेत. पाटीलच्या गैरहजेरीत ते दोघे एकमेकांना भेटत असत. पाटील याला याबद्दल समजल्यानंतर त्याचा पष्टेसोबत वाद झाला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here