वाचा:
‘माझ्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. आमच्या सगळ्या कामांना कायद्याचा आधार आहे’, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. ‘राज्यपाल महोदयांचे भाषण आपण सर्वांनी ऐकलं. राज्यपालांना मी धन्यवाद देतो. त्यांनी नि:पक्षपातीपणे सरकारची कामगिरी सर्वांसमोर ठेवली. त्यातही ते मराठीत बोलले याचा जास्त अभिमान वाटतो. त्यांनी मांडलेल्या मुद्दांवर अनेकांनी आक्षेप घेतला. राज्यपालांनी भाषण मान्य केले पण त्यांच्याच सदस्यांना ते मान्य नाही. राज्यपाल ही आपण संस्था मानता आणि त्या संस्थेवरच आपण अविश्वास व्यक्त केला आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांवर निशाणा साधला.
वाचा:
यांनी शिवभोजन योजनेवर कोपरखळ्या मारल्या होत्या. त्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. आपल्या राष्ट्रपतींच्या भाषणात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत आठ महिन्यांसाठी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे म्हटले आहे. म्हणजे हे सगळे गरीब लगेच श्रीमंत झाले का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. गॅस, इंधन कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते पण आमची कामे मात्र यांना खुपतात. आम्ही रिकामी थाळी वाजवायला सांगितली नाही तर शिवभोजन थाळी पाच रुपयांमध्ये दिली जी अजून सुरु आहे. त्यामुळे भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरीबांना कळतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
वाचा:
राजकीय जोडे बाजूला ठेऊन राज्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते, असे नमूद करताना सीमाप्रश्नी एकत्र येण्याची तयारी दाखवल्याबद्दल कर्नाटकवासी मराठी बांधवांच्यावतीने मी यांना धन्यवाद देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर जी सक्ती लादते ती मोडून तोडून काढू, असा निर्धारच मुख्यमंत्र्यांनी केला.
मराठी भाषा भिकारी आहे का?
मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन होता. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले गेले आहे. मराठी भाषा भिकारी आहे का, ही छत्रपतींची भाषा. ती भाषा भिकारी कशी असू शकते. छत्रपती नसते तर दिल्लीत जे बसले ते तरी असते का? केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, मराठी माती, मराठी माता हे विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
वाचा:
मुख्यमंत्री म्हणाले…
– शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्याप्रमाणात राबवणार.
– गुंतवणुकीत गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे दिसते, तिथे गुंतवणूक होऊ द्या पण ती किती फसवी ते सांगतो.
– नीती आयोगाच्या बैठकीत धोरण ठरवण्याचे पंतप्रधानांना आवाहन केले होते. राज्यातली स्पर्धा खड्डयात घालणारी.
– गुजरातमध्ये आभासी गुंतवणूक. कंपनीचे शेअर घेतले ते उपभोक्ता कंपनीसाठी नाही.
– गुजरातमध्ये जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात १ लाख १६ हजार ५११ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात काही विदेशी कंपन्यांनी या कंपनीचे शेअर विकत घेतले आहेत. ही गुंतवणूक कंपनीमध्ये झाली आहे. उत्पादक उद्योगात नाही. हे येथे स्पष्ट करणे गरजेचे आहे.
– आमची गुंतवणूक प्रत्यक्ष आहे. चुकत असू तर नक्की वाभाडे काढा, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका
– तुमच्याकडून राज्यात गुंतवणूक येत असेल तर तीही करायला हरकत नाही.
– शिवभोजन पाठ थोपटवून घेणारी नसली तरी पोट भरणारी योजना.
– आमच्या योजनांचे वाभाडे काढले, गॅसच्या किंमती वाढल्या, उज्वला गॅस योजनेचे काय झाले?
– खोटे बोलून लाट येते, सत्ता येते पण ती टिकवणे कठीण असते.
– कांजूरमार्ग जागा केंद्र आपली आहे असं म्हणत आहे. मेट्रो प्रकल्प दोन्ही सरकारचा आहे तर मग ही खेचाखेची कशाला, एकत्र बसून मार्ग काढू.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times