दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी कार्यक्रमात पुन्हा येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. निर्मात्यांनी दिशासोबत याबाबतीत चर्चा करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, ३ वर्ष उलटूनही दिशा कार्यक्रमात आलेली नाही. याबद्दल अभिनेत्री हिने तिचं मत व्यक्त केलं आहे. सुनैना गेली अनेक वर्ष कार्यक्रमात अंजली भाभीचं पात्र साकारत आहे. सुनैना या विषयावर बोलताना म्हणाली, ‘आम्ही याबाबतीत स्वतः जाणून घेऊ इच्छितो, कारण आम्हालाचं काही माहिती नाही.’
जेव्हा सुनैनाला दिशाच्या कार्यक्रमात पुन्हा येण्याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘कार्यक्रम हा सगळ्यांचा असतो. प्रत्येक पात्र महत्वाचं असतं. हा कार्यक्रम कुणा एका पात्राबद्दल नाहीये आणि हीच या मालिकेची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर मालिकेतील एखादं पात्र मालिकेत नाहीये आणि प्रेक्षकांना त्या पात्राला पुन्हा पाहण्याची इच्छा आहे, तरीही प्रेक्षक मालिका तितक्याच उत्सुकतेने पाहतात, कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाददेखील मिळतो तर ते मालिकेच्या संपूर्ण टीमचं श्रेय आहे. कोणी एक व्यक्ती त्याचं श्रेय नाही घेऊ शकत. फक्त कुणी एक इथे महत्वाचं नाहीये. प्रत्येक प्रेक्षकांची वेगवेगळी आवडती पात्र आहेत ज्यामुळे मालिका अजून सुरू आहे.’ निर्मात्यांनी दिशाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा शोध सुरु केल्याच्या देखील चर्चा आहेत. दिशाने २०१७ साली एका बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तिने ही मालिका सोडली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times