मुंबई : गुंतवणुकीसाठी खुल्या झालेल्या एमटीएआर टेक्नोलॉजिजच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद दिला आहे. आज पाहिल्याच दिवशी आयपीओ ३.६८ पटीने सबस्क्राईब झाला आहे. ५ मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी अर्ज करता येईल.

आज बाजार सुरु होताच अवघ्या ६० मिनिटांत एकूण शेअरपैकी ७१ टक्के शेअरसाठी प्रस्ताव सादर झाले. या आयपीओतून कंपनी ५९६ कोटींचा निधी उभारणार आहे. त्यासाठी ७२,६०,६९४ शेअर इश्यू केले जाणार आहेत. मात्र संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १,९५,५२,५७२ शेअरसाठी गुंतवणूकदारांनी अर्ज केला आहे.

प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनीची समभाग विक्री योजना आज बुधवार ३ मार्चपासून खुली झाली.आयपीओसाठी कंपनीने प्रति इक्विटी शेअरसाठी ५७४ रुपये ते ५७५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदाराला किमान २६ शेअरसाठी बोली लावता येईल. तसेच १३ लॉटसाठी अर्ज करता येऊ शकतो, असे माहिती पत्रकात म्हटलं आहे.

एमटीएआर टेक्नोलॉजिज ही कंपनी स्वच्छ ऊर्जा (क्लीन एनर्जी), अणु आणि अवकाश व संरक्षण क्षेत्रामधील मिशनसाठी महत्त्वाच्या प्रिसीजन भागांसाठी आणि महत्त्वाच्या असेंब्लीच्या उत्पादन निर्मिती आणि विकासामध्ये कार्यरत आहे.आयपीओत १२४ कोटीपर्यंत फ्रेश इश्यू आणि ४७३ कोटींचे ८,२२,२७० इक्विटी शेअर्सपर्यंत विक्री (ऑफर ऑन सेल) करण्याची योजना आहे. १० मार्च रोजी शेअर वाटप होण्याची शक्यता आहे. तर १५ मार्चपासून गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर जमा होतील.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here