करोनाविरोधी लढाई आणि लसीच्या संशोधनात आजचा दिवस हा मैलाचा दगड ठरला आहे. करोनावरील लसीची तीन टप्प्यात चाचणी केली गेली. ज्याचा डाटा आता समोर आला आहे. लसीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात २७ हाजारांहून अधिक नागरिकांनी भाग घेतला, अशी माहिती भारत बायोटेकचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी सांगितलं.
करोनाविरोधात क्लिनिकल चाचणीत कोवॅक्सिन लस अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. एवढचं नव्हे करोनाच्या नव्या संसर्गजन्य स्ट्रेनविरोधातही ही लस प्रभावी ठरली आहे, असं एल्ला यांनी सांगितलं. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (ICMR) आणि हैदराबादमधील भारत बायोटेकने ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. भारत सरकारने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि ऑक्सफोर्डच्या अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड लसींना मंजुरी दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस ७०.४२ प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. ही लस मॉडर्ना आणि फायजर लसींपेक्षा कमी प्रभावी असल्याचा दावा केला करण्यात आला आहे. पण कुठलीही लस ५० टक्क्यांवर प्रभावी असणं आवश्यक असल्याचं अनेक नियामक संस्थांचं म्हणणं आहे. तर ऑक्सफोर्डने कोविशिल्ड लसची दोन डोस हे ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केला आहे.
कोवॅक्सिन लस तयार करण्यासाठी मृत करोना व्हायरसचा उपयोग केला गेला आहे. जेणे करून नागरिकांना त्यामुळे नुकसान होऊ नये. लसीने शरीरात प्रवेशात केल्यानंतर करोना संसर्गाविरोधात प्रतिकारशक्ती तयार करते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times