गांधीनगरः गुजरात सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा २.२७ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ( ) सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी ३२, ७१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर आरोग्य विभागासाठी ११, ३२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुजरातचे अर्थमंत्री नितीन पटेल यांनी आज नव्यांदा विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. नगरविकास विभागासाठी १३, ४९३ कोटी रुपये, जलसंपदा विभागासाठी ५,४९४ कोटी रुपये आणि पाणीपुरवठ्यासाठी ३,९७४ कोटी रुपये, कृषी कल्याण योजनांसाठी ७,२३२ कोटी रुपये, सामाजिक न्याय विभागासाठी ४,३५३ कोटी रुपये आणि कामगार कल्याण आणि रोजगार विभागासाठी १,५०२ कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

अन्न व नागरि पुरवठा विभागासाठी १२२४ कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. वन आणि पर्यावरण विभागासाठी १८१४ कोटी रुपये, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासाठी ५६३ कोटी रुपये, निर्वासित आणि वृद्धांच्या पेन्शनसाठी १०३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी तरतूद

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी १५०० कोटी रुपयांची ( ) तरतूद करण्यात आली आहे. तर पोलिसांच्या नवीन वाहनांसाठी ५० कोटींची तरतूद आहे. पिक कर्जासाठी १०० कोटी, रस्ते आणि बांधकाम विभागासाठी ११,१८५ कोटी रुपये, परिवहन विभागासाठी १४७८ कोटी, ऊर्जा आणि इंधन खात्यासाठी १३,०३४ कोटी रुपये आणि हवामन बदल खात्यासाठी ९१० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here