वाचा:
शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची धक्कादायक तक्रार सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. संघटनांकडे या महिलांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत आज उमटले. त्यानंतर गृहमंत्री यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देखील याप्रकरणी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून त्यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
वाचा:
अशी आहे समिती
सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये डॉ. कांचन नारखेडे, पोलीस अधिकारी कांचन काळे यांच्यासह अन्य एका महिला डॉक्टर अधिकाऱ्याचा समावेश आहे.
वाचा:
चौकशी सुरु; तक्रारदार महिलेचा जबाब
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश देताच ही महिला समिती दुपारीच गणेश कॉलनीतील आशादिप वसतीगृहात दाखल झाली. त्यानंतर सुमारे चार ते पाच तास या समितीच्या सदस्यांकडून तक्रारदार महिलेसह वसतीगृहातील अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य महिला व मुलींचे जबाब घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, चौकशी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेसह संबधितांचे जबाब घेण्यात येत आहेत. आणखी काही जणांचे जबाब घ्यायचे आहेत. लवकरच याचा अहवाल तयार करुन वरिष्ठांकडे देण्यात येणार आहे.
दरम्यान, चौकशी समितीची घोषणा करतानाच चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सभागृहात स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times