मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी घणाघाती भाषण केले. मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री यांच्यावर थेट शब्दांत हल्ला चढवला. अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यातील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेतून उत्तर दिले. ( )

वाचा:

उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली तेव्हा बंद खोलीत त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही आश्वासन दिले नाही, असे विधान अमित शहा यांनी केले होते. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी शहा आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारचा तीन चाकी रिक्षा असा उल्लेख केला होता. शहा यांची ही टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किती जिव्हारी लागली, हे आज पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी अगदी स्टाइल आणि अमित शहा यांचा समाचार घेतला.

वाचा:

भाजपला हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलंच फटकारलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण तुम्ही ठेवलीत त्यासाठी मी आभारच मानेन पण तुम्हाला आताच बाळासाहेबांचे उमाळे का येत आहेत, हा प्रश्न मला पडला आहे. बाळासाहेबांच्या खोलीत जेव्हा अमित शहा आणि माझी चर्चा झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना दाराबाहेर ठेवलं होतं. आतमध्ये आम्ही फक्त दोघेच होतो. या बंद दाराआड झालेली चर्चा तुम्ही निर्लज्जपणे बाहेर येऊन नाकारताच कसे? मी मुद्दाम याला निर्लज्जपणा म्हणेन. असंसदीय शब्द असला तरी मी तो बोलेन. बंद खोलीत चर्चा झाल्यावर बाहेर येऊन खोटं बोलायचं हेच तुमचे हिंदुत्व आहे का? हेच तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम आहे का?, अशा घणाघाती शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. २०१४ ला युती तुम्ही तोडली तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आजही आहोत, उद्याही राहू, असे खडेबोलही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

वाचा:

बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढता. त्यांना विसरला नाहीत. त्यासाठी धन्यवाद पण त्यांचे हिंदुत्व तुम्ही विसरू नका हे माझे सांगणे आहे. बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले आणि बाळासाहेब राहिले होते हे लक्षात असू द्या. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. तेव्हा बाबरी आम्ही पाडली नाही म्हणून तुम्ही हात वर केले होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. राम मंदिर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे होत आहे आणि आता राम मंदिरासाठी हे घरोघर पैसे मागत फिरत आहेत. असे असले तरी ते आमच्यामुळे होते आहे, असे त्यांना दाखवायचे आहे, असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर साधला. मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या उल्लेखावर सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती हरकत फेटाळण्यात आली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here