वाचा:
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कार्यालयीन वेळेत घोडा बांधण्याची परवानगी या अधिकाऱ्याने आपल्या पत्रात मागितली आहे. देशमुख यांच्या पत्रात मोजकाच पण जिल्हाधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारा मजकूर आहे. या सगळ्यामागे देशमुख यांनी दिलेलं कारणही अजब आहे.
वाचा:
पत्रातील मजकूर असा…
‘मी सतिष पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. घोड्यावर बसून विहित वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल. मी घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी देण्यात यावी, ही विनंती.’ असे पत्र देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले असून त्यानंतर पुढे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.
वाचा:
मेडिकल कॉलेजचा घेतला सल्ला
सतिष देशमुख यांच्या अजब मागणीमुळे जिल्हाधिकारी यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. त्यांनी मग डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे हे पत्र पाठवलं व सल्ला मागितला. तेथील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाने या पत्राच्या अनुषंगाने आपला सल्ला दिला असून तो सल्लाही खासच आहे. ‘पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखीन आदळ आपट होते. त्यामुळे मणका दबण्याची, मणक्यातील गादी दबण्याची तसेच सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठीच्या कण्याचा आजार कमी न होता तो वाढण्याची दाट शक्यता आहे’, असे त्यात नमूद करण्यात आले असून तसे अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सतिष देशमुख यांची विनंती फेटाळताना त्यांना चांगलीच तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times