नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( ) शेतकरी आणि जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे हा विजय झाल्याचं भाजपने म्हटलं आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष तीन नवीन आणि इतर मुद्द्यांवरून सरकारविरोधात नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनतेने अशा तत्वांना नकार दिला आहे. तसंच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात होत असलेल्या विकासावरून आनंदी असल्याचं जनतेनं स्पष्ट केलं आहे, असं केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर ( ) म्हणाले. संसदेत कृषी कायदे मंजूर झाल्यानंतर देशातील बहुतेक सर्व भागांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. यात जनतेने भाजपचा विजय केला आहे, असं जावडेकर म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणूक असो की राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुका, हैदराबाद महापालिका निवडणूक असो की गुजरातमधील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. गुजरातमधील महापालिका निवडणुकांमध्ये आणि सर्व ३१ जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा विजय झाला. २०१५ मध्ये काँग्रेसने २२ जागा जिंकल्या होत्या. ग्रामीण भागातही भाजपचा मोठा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास कामांवर शेतकरी आनंदी आहेत आणि नवीन कृषी कायदे आपल्या हिताचेच असल्याचं त्यांना कळलंय, असा दावा जावडेकर यांनी केला.

विरोधकांची आडकाठी नको

लडाख हिल काउन्सिल, बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिलसह राजस्थानमधील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा शानदार विजय झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या डीडीसी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. शहरांपासून ते गावांपर्यंत भाजपला जनतेने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस मात्र डफली वाजवत बसली आहे. विरोधी पक्षांची आडकाठी जनतेला पसंत नाही. निवडणुकीत काँग्रेसचं सुपडा साफ होतोय. तरीही काँग्रेस वठणीवर येत नाहीए, असं अशी टीका जावडेकर यांनी केली.

‘आणीबाणीत काय झालं? हे सर्वांनाच माहिती आहे’

आजी इंदिरा गांधी यांचा आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. काँग्रसने कुठल्या संस्थेवर कब्जा केला नाही, असंही ते म्हणाले. आणीबाणीच्या काळात संस्थांवर कशा प्रकारे कब्जा केला गेला, आवाज उठवणाऱ्या विरोधकांना कसं तुरुंगात डांबलं गेलं आणि त्यांचा छळ केला गेला, हे सर्वांना माहिती, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here