नागपूर: मंत्रालयातील कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक यांचा बुधवारी येथील लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ( )

वाचा:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी राजेश श्रीवास्तव हे पत्नीसह येथे आले होते. पत्नीला बिलासपूर येथे सोडून दुपारी ते तेथून निघाले. त्यानंतर ते नागपुरात आले. सीताबर्डीतील पूजा लॉजमधील १०४ क्रमांकाच्या खोलीत ते थांबले. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नाश्ता केल्यानंतर ते बाहेर गेले. काही वेळाने परत लॉजमध्ये आले. त्यानंतर सायंकाळी ते खोलीतून बाहेर न निघाल्याने येथील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी श्रीवास्तव यांना आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. कर्मचाऱ्याने खिडकीतून बघितले असता श्रीवास्तव हे मृतावस्थेत दिसले आणि एकच खळबळ उडाली.

वाचा:

कर्मचाऱ्याने हॉटेल व्यवस्थापकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर व्यवस्थापकाने लगेचच सीताबर्डी पोलिसांना कळविले. ही माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. दरवाजा तोडून पोलीस खोलीत गेले व मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलकडे रवाना केला आहे. पोलिसांनी खोलीतील आधारकार्ड, मोबाइलसह अन्य साहित्य जप्त केले आहे.

वाचा:

दरम्यान, १ मार्च रोजी दुपारी श्रीवास्तव हे बिलासपूरमधील इद्रावती भवनमधून बाहेर निघाले. दुपारी १२.३० वाजता त्यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे छेडीखेडी पुलाजवळ आढळून आले, असे कळते. बदली झाल्याने ते तणावात होते व त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्रालयातून झाले होते बेपत्ता?

रायपूरमधून मात्र याबाबत वेगळी माहिती पुढे येत आहे. राजेश श्रीवास्तव हे १ मार्च रोजी येथून मंत्रालयातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, नागपूरमधील लॉजमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच रायपूर पोलिसांची टीम नागपूरसाठी रवाना झाली आहे, असे सांगण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here