जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने सचिनने आपल्या चाहत्यांसाठी त्याच्या फेसबुक पेजवर ताडोबा-अंधारीतील व्याघ्र सफारीचा खास व्हीडीओ शेअर केला आहे. ४ मिनिट ३५ सेकंदाच्या या व्हिडीओत सचिनच्या चेहऱ्यावर व्याघ्र दर्शन झाल्यानंतर आनंद व्यक्त होताना दिसत आहे. ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भेट आपल्याला खुपच भावली. मला येथे भेट द्यायला आवडते. येथील निसर्ग सौंदर्य मनाल खुपच भावले. येथील आगळावेगळा अनुभव शब्दात व्यक्त करता येणार नाही’, असे सचिनने या व्हिडीओ सोबत लिहिले आहे. सचिनने ताडोबा-अंधारीतील हा व्हिडीओ आपल्या पेजवर बुधवार, ३ मार्चला रात्री दहाच्या सुमारास शेअर केला. त्यानंतर काही वेळेतच त्याला ३० हजारांवर लाइक्स मिळाला. ४९९ कॉमेंट्स आणि ६०८ चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअरही केला. सचिनच्या फेसबुक पेजचे २७ दशलक्ष लाइक्स असून जगभरातील ३५ दशलक्ष लोक या पेजला फॉलो करतात. अशात जागतिक वन्यजीव दिनानिमित्त सचिनने ताडोबा-अंधारीचा व्हिडीओ शेअर केल्याने त्या फायदा चंद्रपुरातील पर्यटन क्षेत्राला नक्कीच होईल, अशा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times