म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि ताण लक्षात घेता, अग्निशमन दलाचा विस्तार होत असून त्यात आपत्कालीन यंत्रणेस सक्षम, पूरक आणि पर्यायी व्यवस्थेचीही तरतूद केली जात आहे. त्या हेतूने बोरिवलीत सुरू केलेल्या अग्निशमन केंद्रात अद्ययावत बॅकअप केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यामुळे क्वचित प्रसंगी १०१ हा आपत्कालीन क्रमांक बंद पडल्यास बोरिवलीतील दलाचे आपत्कालीन रिकव्हरी केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळ्यातील मुख्य केंद्रातील भायखळा नियंत्रण कक्षाच्या स्तरावर १६ मार्गिका कार्यन्वित केल्या जातील. त्यामागे आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी यंत्रणा तैनात होण्यासाठी या मार्गिकांचा उपयोग होणार आहे.

वाचा:

मुंबईत आपत्कालीन प्रसंग ओढवल्यास १०१ प्रमाणेच १९१६ हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. त्याच्या सहाय्याने तातडीने दुर्घटनास्थळाची माहिती देणे आणि समन्वय साधने सोपे ठरते. शहरात गोंधळीची स्थिती उडू नये म्हणूनच ही संपर्क यंत्रणा मदतीस येते, तर पालिकेने आपत्कालीन विभागासाठी परळ येथे एक पर्यायी बॅकअप केंद्र सुरू केले आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन प्रसंगात तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास बोरिवलीतील बॅकअप केंद्राचे सहाय्य घेतले जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

जोखीम पूर्वसूचना आराखडाही लवकरच

शहरात विविध प्रकारच्या आपत्कालीन प्रसंगाना तोंड देण्यासाठी पालिकेच्या यंत्रणा कार्यरत असतात. त्याचप्रमाणे मुंबईतील संभाव्य दुर्घटनांविषयी मुंबईकरांना वेळीच माहिती मिळावी म्हणून पालिकेकडून जोखीम पूर्वसूचना आराखडाही तयार केला जाणार आहे. त्याअंतर्गत संपूर्ण वर्षभर पालिकेकडून मोहीम राबवली जाणार आहे. त्यात दुर्घटना होण्यासंदर्भात पूर्वकल्पना, आपत्कालीन स्थितीत बचाव आदींचे प्रशिक्षण देणे अशा गोष्टी केल्या जातील. पालिकेच्या जोखीम आराखड्यात पोलिस ठाणी, , आरोग्य यंत्रणा आदींचे डिजिटल मॅपिंग केला जाणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here