म. टा. प्रतिनिधी, : परिसरात एका व्यक्तीची झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीची पत्नी, मेहुणी आणि मित्र अशा तिघांच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. मुंब्रा पोलिसांनी केवळ ७२ तासांच्या आता या गुन्ह्याची उकल केली आहे.

मोहमद नफीज मोहमद शफिक शेख, रुक्सार अहमद शेख, रेश्मा मेहबूब सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत. रुक्सार हिचा पती अहमद दाऊद शेख याची चॉपरने वार करून करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा परिसरातच फेकून देण्यात आला होता. मृतदेह मिळाल्यानंतर या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात २७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु मृतदेह नेमका आहे कोणाचा, याबाबत ओळख पटली नव्हती. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान मुंब्रा पोलिसांपुढे होते. सहाय्यक पोलिस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामचंद्र वळतकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष उगलमुगले, शहाजी शेळके, पोलिस उप निरीक्षक संजय गळवे यांच्या पथकाने मुंब्रा आणि आसपासच्या परिसरात मृतदेहाबाबत चौकशी सुरू केली. अखेर मृतदेहाची ओळख पटली आणि हा मृतदेह येथील शिमला पार्कमध्ये राहणारा अहमद शेख याचा असल्याची बाब समोर आली.

पोलिसांनी अहमदची पत्नी रुक्सार आणि मेहुणी रेश्मा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिस लक्ष ठेऊन होते. तर, दुसरीकडे तांत्रिक तपास करत अहमद याचा अत्यंत जवळचा मित्र रिक्षाचालक मोहमद नफीज मोहमद शफिक शेख याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, धक्कादायक बाब समोर आली. त्याने अहमदची पत्नी आणि मेहुणी यांच्याशी संगनमत करून हत्येचा कट रचून आणि ही हत्या केल्याची बाब समोर आली. त्यामुळे मोहमद नफीजसह त्या दोघींना पोलिसांनी बुधवारी अटक केले, अशी माहिती पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. जरीचे काम करणाऱ्या अहमदची हत्या करण्यापूर्वी त्याला आरोपींनी दारू पाजली होती, अशी माहिती अंबुरे यांनी दिली. मुंब्रा पोलिसांनी ७२ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here