महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात प्रकल्पातून कल्याणच्या ग्रामीण भागातील खोणी येथे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. यातील गोल्डन ड्रीम प्रोजेक्टमधील आर्चिड इमारतीमधील सात सदनिका एकाच दिवशी काढण्यात आलेल्या सोडतीत म्हाडातील अधिकाऱ्याच्याच सात नातेवाईकांना देण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्याकडे केली आहे.
वाचा:
यापूर्वी शासनाच्या विविध योजनांमधून उभारलेल्या गृहप्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून अधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींना किंवा नातेवाईकांनाच या गृहसंकुलांचा लाभ झाला आहे. आता पुन्हा एकदा म्हाडाच्या घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. म्हाडाच्या अधिकारी असलेल्या छाया राठोड यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. म्हाडाच्या खोणी येथील गोल्डन ड्रीम प्रोजेक्टमधील आर्चिड इमारतीमधील सदनिका छाया राठोड यांच्या बहिणीचा नवरा कुलदीप चव्हाण, चुलतभाऊ द्या राठोड, बहिणीच्या नवऱ्याची बहीण वर्षा आडे, सावत्रभाऊ वसंत राठोड, सख्खा भाऊ महेश राठोड, वडील वामनराव राठोड, नातेवाईक मोरेश्वर जाधव यांना लिलावाद्वारे प्राप्त झाल्या आहेत. एकच दिवशी काढण्यात आलेल्या सोडतीत एकाच अधिकाऱ्याच्या सात नातेवाईकांना सदनिका मिळाल्याने या सोडतीत घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त करत अशा प्रकारे आणखी काही अधिकाऱ्यांनीदेखील पदाचा गैरवापर करत आपला आणि नातेवाईकांचा फायदा करून घेतला असण्याची शक्यता असल्याचा आरोप करत या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, अशी मागणी पाटील यांनी म्हैसकर यांच्याकडे केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times