म. टा. प्रतिनिधी, : पदमपुरा येथील महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये डॉक्टरने एका महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना खळबळजनक घडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले असून, उद्या गुरुवारी (४ मार्च) दुपारपर्यंत चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे.

सूत्रांनी सांगितले, की संबंधित करोनाबाधित महिला दोन दिवसांपूर्वी उपचारांसाठी कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल झाली. मंगळवारी रात्री सेंटरमध्ये ड्युटीवर असलेल्या एका डॉक्टरने त्या महिलेला तपासण्यासाठी बोलावून तिच्याशी लगट केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ती महिला घाबरली आणि तिने आरडाओरडा केली. त्यामुळे सेंटरमध्ये गोंधळ उडाला.

सेंटरमधील अन्य कर्मचाऱ्यांनी धावाधाव करून डॉक्टरला बाजूला केले, त्या महिलेला वॉर्डमध्ये पोहोचवले. बुधवारी या घटनेची माहिती आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना देण्यात आली. पांडेय यांनी ह प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. गुरुवारी दुपारपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here