या प्रकरणी ८० वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चार अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला केअर टेकरसह पाषाण येथील पंचवटी सोसायटीत राहतात. बुधवारी (तीन मार्च) सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास चार अनोळखी व्यक्ती फिर्यादीच्या घरात जबरदस्ती घुसल्या. त्यांच्या हातात कोयता, सुरा, काठी आदी साहित्य होते. त्यांनी सुरुवातीला केअर टेकरला जखमी केले.
त्यानंतर केअर टेकरसह फिर्यादीचे हात आणि तोंड कापडाने बांधले. चोरांनी किंमती मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी घरातील सर्व सामान विस्कटून टाकले. त्यानंतर चोरांनी ‘माल कोठे आहे,’ अशी विचारणा करून, त्यांनी पहिल्या मजल्यावरील बेडरूमच्या कपाटातील दरवाजे उचकटले. त्यामध्ये ठेवलेले २५ हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज त्यांनी लुटून नेला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times