जळगावातील एका महिला वसतीगृहात धक्कादायक गैरप्रकार होत असल्याची लेखी तक्रार जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज लतीफ पिंजारी, मंगला महेश सोनवणे, फरीद मुशीर खान, साहिल अय्युब पठाण, आबीद नजीर शेख, वर्षा लोहार, कादरिया फाऊंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी यांनी मंगळवारी (दि.२) सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या निवेदनासह यातील एका सदस्याने संबधित वसतीगृहातील एका महिलेने केलेली तक्रार मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग केली होती. ती देखील जिल्हाधिकारी यांना दाखवून ती व्हायरल केली होती. या व्हायरल व्हिडीओमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या.
तक्रार करणाऱ्या संस्थेच्या सदस्यांचे जबाब
या प्रकरणी विधानसेभत पडसाद उमटल्यानतंर काल बुधवारी गृहमंत्री यांच्या आदेशानतंर जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन करुन चौकशीस सुरुवात केली. या समितीने तक्रारीचे निवेदन देणाऱ्या नऊ जणांना सायंकाळी ५.३० वाजता अल्पबचत भवन येथे बोलावण्यात आले. पहाटे ३.३० वाजेपर्यंत संस्थेच्या सदस्यांसह नऊ जणांचे इनकॅमेरा जबाब नोंदवण्यात आले.
जबाबात तफावत; निवेदन वाचलेच नसल्याची माहिती
समितीने घेतलेल्या जबाबत यातील काही जणांनी या प्रकरणाशी आपला काहीच संबध नाही, निवेदन न वाचताच त्यावर सही केली असल्याचे सांगीतले आहे. काहींनी तर आपण वसतीगृहात गेलोच नव्हतो असे स्पष्ट केले. यातील बहुसंख्य सदस्यांच्या जबाबत तफावत देखील आढळून आली आहे. समितीसह पोलिसांनी घेतलेले हे जबाब वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times