जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील विद्यानगर येथे राहणारे तथा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका असलेल्या कविता कृष्णकांत चौधरी या मुलगा लावण्य याला दुचाकीवरून रोज शाळेत घेऊन जात होत्या. आज, गुरुवारी सकाळी दहा वाजता कविता चौधरी या मुलाला घेऊन जात असताना, ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात आई व मुलगा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच एरंडोलचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान ट्रक चालकाविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संथगतीने होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामाचे बळी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळेच या महिलेसह चिमुकल्याचा बळी गेला, अशा शब्दांत आपला संताप एरंडोल येथील नागरिकांनी व्यक्त केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times