कंगनाने तिने बनवलेल्या सकाळच्या नाश्त्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यावर अनेकांनी तिला प्रतिक्रिया दिल्या. यात एका युजरने त्याच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आणि कंगनाला त्याच्या मुलीच्या वाढदिवसादिवशी तिला शुभेच्छा देण्याची मागणी केली. चाहत्याच्या या कमेंटवर कंगनाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, एका दुसऱ्या युजरने त्यावर प्रतिक्रिया देत त्याला सुनावले. युजरने म्हटलं, ‘तुमची मुलगी खूप सुंदर आहे. पण तुम्हाला तिच्यासाठी कंगनाच्या शुभेच्छा हव्या आहे? तर तिने देखील एकदिवस कंगनाप्रमाणे तिच्या वडिलांच्या कानाखाली मारावी म्हणून, सिगारेट ओढावी म्हणून, घर सोडून जावं म्हणून की ड्रग एडिक्ट बनावं म्हणून? तुम्हाला हेच हवं आहे का? तिला तिच्या आजी आजोबांचा आणि देवाचा आशीर्वाद द्या.’
या दोन्ही ट्विटवर कंगनाने काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. परंतु, इतरांनी मात्र युजरच्या मुलीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. कंगनाने यापूर्वी ट्विट करत स्वतः याबद्दल माहिती दिली होती की, तिने लहानपणी घर सोडलं होतं. तिला वडिलांना अनेकदा कानाखाली मारायची इच्छा झाली होती. शिवाय बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हतं त्या दिवसात ती ड्रगचं सेवनदेखील करायची.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times