बेंगळुरू: केंद्र सरकारने देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची ( ) यादी जाहीर केली आहे. यात देशात राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगळुरूने बाजी मारली आहे. बेंगळुरू शहराने यात अव्वल स्थान मिळवले असून दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील पुणे ( ) शहर आहे. यासह आघाडीवर असलेल्या पहिला १० शहरांमध्ये मुंबई ( ), अहमदाबाद, चेन्नई, सुरत, कोयम्बतूर, बडोदा, इंदुर आणि नवी मुंबईचा ( ) समावेश आहे. तर राजधानी नवी दिल्ली टॉप टेनमध्ये नाहीए. नवी दिल्ली १३ व्या क्रमांकावर आहे.

१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या राहण्यायोग्य शहरांच्या श्रेणीत ४९ शहरांचे आढावा घेतला गेला. यात सर्वात शेवटच्या स्थानावर श्रीनगर आहे. तर कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसह १११ शहरांची समीक्षा केली गेली. सरकारने आज ही (livability index) यादी जाहीर केली. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही यादी जाहीर केली. १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये शिमलाने पहिला क्रमांक पटकावला आहे.

नवी दिल्ली महापालिकाने १० लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीत ‘नगरपालिकांची कामगिरी’ यात नवी दिल्ली नगरपालिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदुर महापालिकेने पहिला क्रमांक मिळवला आहे. इंदुरचा पहिला क्रमांक आल्याने आमचा उत्साह वाढला आहे. आणखी चांगलं काम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, असं इंदुर महापालिकेच्या आयुक्त प्रतीभा पाल यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here