वाचा-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पणाची संधी मिळालेल्या मोहम्मद सिराजने आतापर्यंतच्या छोट्या कसोटी करिअरमध्ये शानदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने दोन विकेट घेतल्या. पहिल्या दिवशी पाहूण्या संघाचा २०५ वर ऑल आउट केल्यानंतर भारताने १ बाद २४ धावा केल्या.
वाचा-
दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराजने मैदानावर झालेल्या शब्दिक चकमकीबाबतचा खुलासा केला. सिरजाने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या त्याच्याकडे पाहून काही तरी बोलला. याबाबत सिराजला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, बेन स्टोक्सने मला शिवी दिली. ही गोष्ट विराट भाईला सांगितली. त्यानंतर त्याने संभाळून घेतले.
वाचा-
वाचा-
रुटला बाद केल्यानंतर मैदानावर आलेल्या स्टोक्सला सिराजने बाउसर चेंडू टाकला. स्टोक्सला ते आवडले नाही. त्याने सिराजला कडेपाहून काही तरी बोलला. त्यानंतर विराटने जाऊन स्टोक्सला यासंदर्भात विचारणा केली. दोघांमध्ये बराच वेळ शाब्दिक वाद सुरू होता. नंतर अंपायरनी तो मिटवला.
वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times