पिंपरी: विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगतापनगर, थेरगाव येथे मंगळवारी (२ मार्च) हा प्रकार घडला. याप्रकरणी ठाण्यात गुरुवारी (४ मार्च) गुन्हा दाखल झाला. ( )

वाचा:

(रा. , काळेवाडी), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक मजकूर असलेले वक्तव्य करून आरोपीने त्याचा व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित केला. त्याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला. त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष व रोष निर्माण होऊन भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी दाखले याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here