सांगली: जिल्ह्यातील येथे उपसरपंच निवडीच्या वादातून आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य यांचा मृत्यू झाला. या घटनेत गणेश पाटील हे सदस्य गंभीर जखमी झाले आहेत, तर अन्य दहा ते बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या बाहेर ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्धन काळे (वय ५७, रा. बोरगाव) यांना डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याने या मारहाणीत काळे यांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.

वाचा:

नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी बोरगाव ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन केले होते. सदर उपसरपंच पदासाठी भाजपाकडून सुजित पाटील आणि राष्ट्रवादीकडून गणपती पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य भाजपचे खासदार संजय पाटील गटाचे आहेत, तर तीन सदस्य राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील गटाचे आहेत. यातील खासदार संजय पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणनीती आमदार सुमन पाटील गटाने आखली होती. उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले.

वाचा:

काठ्यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे यांना डोक्यात काठ्यांचा मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरगावमध्ये तणाव वाढल्याने पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here