नवी दिल्लीः दिग्दर्शक ( ), अभिनेत्री ( ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये ( ) कोट्यवधींच्या घोळ असल्याचं समोर आलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे टीकाकारांना लक्ष्य करत असल्याचा आरोप विरोधकांकडून असताना प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी मोठी मोहिती दिली आहे. प्राप्तिकर विभाग ३ मार्चपासून २ मोठे फिल्म प्रोडक्शन हाउस, एक अभिनेत्री आणि मुंबईतील दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे टाकत आहे. हे छापे मुंबई, दिल्ली, पुणे आणि हैदराबादमध्ये टाकण्यात येत आहे, असं प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं. आतापर्यंत एकूण २८ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून प्रोडक्शन हाउसने दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा कमाई अधिक आहे. आणि याचे पुरावे हाती आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना ३०० कोटी रुपयांचा हिशेब देता आलेला नाही. चित्रपट दिग्दर्शक आणि भागिदारांमध्ये प्रोडक्शन हाउसमधील व्यवहारात मोठी प्रमाणात हेराफेरी आहे. कमी मूल्यांकनाशी संबंधित जवळपास ३५० कोटींचा निधीचे पुरावे मिळाले आहेत. यासंबंधी पुढीत तपास सुरू आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

अभिनेत्री तापसी पन्नूने पाच कोटींची रोख रक्कम घेतल्याचे पुरावे आढळले आहेत. आता याचा पुढील तपास सुरू आहे, असं सूत्र म्हणाले. याशिवाय प्रमुख निर्माते, दिग्दर्शकांच्या व्यवहारांमधील घोळही समोर आला आहे. जवळपास २० कोटींची फेरफार करण्यात आली आहे. अभिनेत्री तापसीच्या बाबतीतही असंच आढळून आलं आहे. दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या कार्यालयाच्या परिसरात, ई मेल, व्हॉट्सअॅप चॅट, हार्ड डिस्क यासह इतर स्वरुपातील मोठा डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे. याचा तपास सुरू आहे. तपासणीदरम्यान ७ बँक लॉकर आढळले आहेत आणि त्यासंबंधी चौकशी सुरू आहे. सर्व ठिकाणांवर तपासणी सुरू आहे.

दरम्यान, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईत पुणे परिसरातही तपासणी करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील मुंबई – बेंगलुरू महामार्गावरील बड्या हॉटेलमध्ये या कलाकारांच्या नावाने हॉटेलमधील खोल्या आरक्षित असल्याची माहिती असल्याने ही तपासणी करण्यात आली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here