कोल्हापूर: निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. अंतिम मतदार यादी निश्चित होताच कोणत्याही क्षणी मतदानाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. असे असतानाच काही ठिकाणी विरोधकांनी भानामती आणि करणीच्या माध्यमातून भीती घालण्यास सुरुवात केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात नावाची यादी आणि त्याला लिंबू, टाचणी टोचून टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.

वाचा:

कळंबा येथील बापूरामनगर परिसरात महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या अनेक उमेदवारांची यादी सापडली आहे. एका साध्या कागदावर पेनाने लिहिलेल्या या यादीत आजूबाजूच्या प्रभागातील अनेक इच्छुकांची नावे होती. याशिवाय काही प्रमुख कार्यकर्त्यांबरोबरच शहरातील इतर विविध मतदार संघातील भावी उमेदवारांची नावे लिहिलेली होती. या कागदाला लिंबू, टाचण्या, काळा दोरा, लोखंड बांधून तो ठेवण्यात आला होता. काही कार्यकर्त्यांना ही यादी सापडल्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीला कळविण्यात आले.

वाचा:
ही पुरोगामी नगरी म्हणून ओळखली जाते. पण या पुरोगामी नगरीत अनेक कोपऱ्यावर आजही लिंबू कापून त्यामध्ये हळद व कुंकू टाकून कोपऱ्याकोपऱ्यावर टाकले जातात. याशिवाय नैवेद्यही टाकला जातो. आता तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना भीती घालण्यासाठी भानामती आणि करणी करण्याचा प्रकारही केल्याचे उघडकीस आले आहे. या नावामध्ये काही विद्यमान नगरसेवकांच्या नावांचाही समावेश आहे. सध्या महापालिका निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. येत्या १२ मार्च रोजी अंतिम मतदार यादी निश्चित होणार आहे.त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. यामुळे इच्छुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचाराबरोबरच आता भानामतीची भीती घालून काहींना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे लिंबू आणि टाचण्या लावून टाकलेली यादी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

वाचा:

कोल्हापूर सारख्या पुरोगामी नगरीत भानामती सारखा प्रकार होणे हे निश्चितच चुकीचे आहे .यातून कोल्हापूरची प्रतिमा तर मलिन होणार आहेच शिवाय संदेशही चुकीचा जाणार आहे. चांगले काम करून निवडून येण्याऐवजी भानामती करून इतरांना भीती घालण्याचा हा प्रकार मूर्खपणाच आहे- , सामाजिक कार्यकर्त्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here