म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘काही नेते म्हणतात मी मास्क लावतच नाही, पण बाकीच्यांना करोना झाला तर काय करायचे’, असा टोला विधान परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मनसे अध्यक्ष यांचे नाव न घेता लगावला.

वाचा:

करोनाविषयक नियम पाळणे गरजेचे आहे. पण काही नेते म्हणतात की मी मास्क लावतच नाही. पण असे न करता मास्क लावून काळजी घ्या, असा सल्ला अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांना दिला. तसेच हा सल्ला देताना तुम्ही मास्क लावत नसल्याने इतरांना करोना झाला तर काय, असा प्रश्नही त्यांनी राज यांना विचारला. त्याचवेळी विरोधी पक्षनेते यांनाही त्यांनी टोला लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क लावायला पाहिजे, असे सांगत, ते प्रवीण दरेकर यांचे जुने नेते आहेत, असेही हसतहसत अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

वाचा:

मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मनसेनं शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी
लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,’ असं ते म्हणाले होते. राज यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा रंगली होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here