म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जाणारे ६७ टीएमसी पाण्यावर कोकणातील जनतेचा हक्क आहे. ते पाणी नाणार प्रकल्पाला देण्याचा प्रयत्न केला तर तो आपण हाणून पाडू, असा इशारा शिवसेनेचे सदस्य यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला. कोकणावर सतत अन्याय होत असून, पश्चिम महाराष्ट्राला नेहमी झुकते माप दिले जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

वाचा:

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार असून, शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या रामदास कदम यांनी विरोधकांसारखा सरकारी धोरणावर दांडपट्टा चालविला. विदर्भ, मराठवाडा या मागास भागांच्या धर्तीवर कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही कदम यांनी केली. जनहिताच्या प्रश्नाबाबत सरकारला लोकप्रतिनिधी या नात्याने चार-पाच पत्रे पाठवल्यानंतरही कामे मार्गी लागत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती.

कदम यांच्या या भाषणावर, करोनाच्या संकटामुळे १० ते ११ महिने गेले आहेत. आता मात्र रत्नागिरी आणि कोकणच्या जनतेच्या सरकार न्याय देईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

कोकणातील समस्यांचा पाढा

कोकणातील मच्छिमारांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, एलईडी मासेवारी बंदी घालण्यासाठी केरळ आणि कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात कायदा करण्यात यावा. खेडच्या पोलीस ठाण्याला १०० वर्षे पूर्ण झाली असून, तीन अधिवेशन झाली पण खेड पोलिस स्टेशन अथवा पोलिस वसाहतीला सरकारने दमडासुद्धा दिला नाही, असा घरचा आहेर पुन्हा एकदा दिला. रत्नागिरी जिल्ह्यात जनावरांवर उपचार करणारे पुरेसे डॉक्टर नाहीत. सरकारला पाच पत्रे दिली आहेत. मला काम नाही म्हणून सरकारला सारखी पत्रे पाठवत असतो, असा कोणी अर्थ काढता कामा नये. दापोली तालुक्यासाठी १०० खाटांचे हॉस्पिटल ताबडतोब मंजूर करतो, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ ही म्हण प्रत्यक्षात येण्यासाठी कामे व्हायला हवीत असेही कदम म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here